सिंगल मर्दांसाठी हे देश स्वर्गतुल्य


आजकाल जगभरातच पर्यटनाचे वेड अमाप वाढले आहे. कुणी निसर्गसौंदर्यासाठी, कुणी धार्मिक कारणांसाठी, कुणी वैद्यकीय कारणांनी, कुणी साहस म्हणून, कुणी कंटाळा घालविण्यासाठी तर कुणी मजा म्हणून प्रवास करतात. यातील कांही गुलछबू मर्द आणखीही कांही नयनसुखद पाहण्यासाठी जमल्यास त्याचा उपभोग घेण्यासाठी पर्यटनाचा पर्याय स्वीकारतात. अशा मर्द लोकांसाठी जगातील कांही देश स्वर्गतुल्य आहेत. म्हणजे या देशांत पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक आहेत.

अनेक देशात पुरूष व महिला यांचे परस्पर प्रमाण खूपच धोकादायक पातळीवर गेले आहे. म्हणजे पुरूषांच्या तुलनेत महिला कमी आहेत. कतर सारख्या देशात हे प्रमाण दर हजारी पुरूषांमागे ३०० महिला इतके आहे. अशा देशांत रस्त्यांवर सुंदर दिसण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. मात्र कांही देशांत पाहाल तेथे मुली, महिला दिसतील. यात पहिला नंबर लागतो तो युरोपियन देश लॅटवियाचा. या देशात पुरूष महिलांचे प्रमाण दर १०० पुरूषंामागे ११८ महिला असे आहे.

त्या खालोखाल क्रमांक लागतो युक्रेन व लिथुआना यांचा. या दोन्ही देशात १०० पुरूषंमागे महिलांचे प्रमाण आहे ११७. सौंदर्यवतींसाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातही हे प्रमाण १०० पुरूषांमागे ११६ महिैला असे आहे. अनेक सुंदर चर्चेससाठी प्रसिद्ध असलेल्या पूर्व युरोपमधील बेलारूस मध्ये हेच प्रमाण आहे. चीनच्या अधिपत्याखाली पण तरीही स्वातंत्र उपभोगणार्‍या हाँगकाँगमध्ये हेच प्रमाण १०० पुरूषांमागे ११३ महिला असे आहे. तर फ्रान्सच्या सुंदर ग्वीडलॉप बेटावर हे प्रमाण १०० पुरूषांमागे ११२ महिला असे आहे.

भारताचा विचार केला तर येथे पुरूष व महिलांचे प्रमाण १ हजार पुरूषांमागे ९३४ महिला असे आहे.

Leave a Comment