जाणून घ्या व्हायरल झालेल्या आकाश अंबानीच्या पत्रिकेमागील सत्य


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्या कथित लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. दीड लाखाच्या घरात आकाश अंबानींच्या नावे फिरणाऱ्या या पत्रिकेची किंमत असल्याचे म्हटले जात होते. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

‘टाइम्स नाऊ’च्या वेबसाईटवरील रिपोर्टमध्ये अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आकाश अंबानी यांच्या विवाहाबाबत करण्यात आली नसून, कोणतीही पत्रिका छापलेली नसल्याचे ‘रिलायन्स’ने सांगितल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर आकाश अंबानी याच्या लग्नाची पत्रिका अशा नावाने या पत्रिकेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका व्हिडिओत दिसत होती.

सोशल मीडियावर आकाश अंबानीची कथित पत्रिका टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या दिवशीच व्हायरल झाली. पण ही पत्रिका म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment