नवी दिल्ली : आपण कंम्प्युटवर किंवा मोबाईलवर गेम खेळत असलो तर आपल्या एकतर आपल्या बॉसचा किंवा घरातील सदस्याचा हमखास ओरडा खावा लागतोच लागतो. असे तासोनतास एकच जागी बसून गेम खेळणाऱ्या व्यक्तीला आपण एकतर वेडा किंवा आळशी म्हणतो. त्याचबरोबर माझापेपरने देखील अशा स्वरुपाची बातमी दिली होती की गेम खेळण्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक असते. पण सतत गेम खेळल्यामुळे कोणी श्रीमंत झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ना मग आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देतो जो फक्त गेम खेळून कोट्याधीश झाला आहे.
यूट्युबमुळे हा पठ्ठा कमावतो वर्षाला ८० कोटी रुपये
तो आहे २६ वर्षीय डॅन मिडल्टन, त्याने व्हिडिओ गेम्स खेळण्याचा आपला छंद जपत त्यातून पैसे कमवण्यासाठी वापर केला. त्याने त्यातून थोडेथोडके नव्हे तर इतकी बक्कळ कमाई केली की २०१७ मधील सर्वाधिक श्रीमंत यूट्युबरच्या यादीत डॅन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
याबाबत ‘फोर्ब्स’ने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ८०-९० कोटीच्या घरात डॅनचे वार्षिक उत्पन्न आहे. ‘DanTDM’नावाचा यूट्युब चॅनेल डॅनचा आहे. तो त्यातून व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू देतो. त्याचे गेम्स रिव्ह्यू चांगलेच लोकप्रिय ठरले. दीड कोटींहून अधिक लोकांनी त्याचे व्हिडिओज पाहीले आहेत.
सर्वात श्रीमंत यूट्युबरच्या यादीत डॅननंतर सहा वर्षांचा रायनचा क्रमांक लागतो. त्याची वर्षिक कमाई ही ७० कोटी असून रायन हा जगातील सर्वात लहान श्रीमंत यूट्युबर आहे.