वोल्वोची बहुप्रतिक्षित ‘वोल्वो एक्ससी ६०’ भारतात लॉन्च


मुंबई : वोल्वोने आपली बहुप्रतिक्षित ‘वोल्वो एक्ससी ६०’ ही लक्झरी कार भारतात अखेर लॉन्च केली आहे. १९६९ सीसीचे ४ सिलिंडर ट्विन टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन ‘वोल्वो एक्ससी ६०’मध्ये देण्यात आले आहे. यामध्ये ४००० आरपीएम वर जास्तीतजास्त २३३ बीएचपीची पॉवर आणि ४८० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट केला जातो. याच्या इंजिनला ८ स्पीड गिअरट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे.

४ झोन क्लायमेट कन्ट्रोल, एअर सस्पेन्शन सिस्टम, १५ स्पीकर ऑडिओ सिस्टम, ९ इंच स्क्रीन, ब्लॅक सॉफ्ट टच डॅशबोर्ड, पॅनोरॉमिक सनरुफ अशी फिचर्स या गाडीत देण्यात आली आहेत. इको, कम्फर्ट, ऑफ रोड, डायनॅमिक आणि इंडिव्हिज्युअल अशी पाच ड्राईव्ह मोडस् या गाडीत उपलब्ध आहेत. या गाडीत सुरक्षेसाठी क्रूज कंट्रोल, पायलट असिस्टम, लेन किपिंग अॅड, पार्क पायलट असिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा व्ह्यू, हिल स्टार्ट असिस्ट असे फिचर्सही देण्यात आले आहेत. भारतातील एक्स शोरुम या कारची किंमत ५५.९० लाख रुपये ऐवढी आहे.