फ्लिपकार्टच्या नव्या सेलमध्ये स्मार्टफोनवर भरघोस सवलत


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने ‘न्यू पिंच डेज्’ सेल आणला आहे. अनेक उत्पादनावर या सेलमध्ये कंपनी भरघोस सूट देणार आहे. स्मार्टफोनवर यामध्ये खास ऑफरही असणार आहेत. १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत फ्लिपकार्टचा हा सेल असणार आहे.

स्मार्टफोनसह इतर मोबाइल अॅक्सेसरीजवर देखील या सेलमध्ये बरीच सूट मिळणार आहे. याशिवाय एचडीएफसी क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना तात्काळ १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज यासारख्या अनेक प्रोडक्टचा समावेश असणार आहे.

बऱ्याच ऑफर गुगल पिक्सल 2, HTC U11, LG V20, Mi Mix 2 या स्मार्टफोनवर देण्यात आल्या आहेत. तसेच मोटो X4,सॅमसंग गॅलक्सी On Nxt,ओपो F3 प्लस , लेनेव्हो K8 प्लस ऑनर 9i या स्मार्टफोनवरही सूट मिळणार आहे.

शाओमी Mi Mix 2 या स्मार्टफोनवर ३००० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. याची मूळ किंमत ३५,९९९ रु. असून सेलमध्ये हा फोन ३२,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. गुगल पिक्सल २ (६४ जीबी) या फोनवर तब्बल ११००१ रुपयांची फ्लॅट सूट मिळणार आहे. या फोनची किंमत सध्या ६१,००० रुपये आहे. तसेच यावर १८,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलक्सी जे३ प्रो हा २ जीबी रॅम मॉडेल स्मार्टफोन ६९९० रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारात ज्याची किंमत ८४९० रुपये आहे. तर गॅलक्सी ऑन Max हा १४,९९० रुपयात खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर लेनोव्हा के८ प्लस या स्मार्टफोनवर २००० रुपयांची सूट देण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन आता ८९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच ओप्पो एफ ३ प्लस हा २२९९० रुपये किंमतीचा स्मार्टफोन आता १७९९० रुपयात खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलक्सी ऑन Nxt हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये १४९९० रुपयात खरेदी करता येईल.

Leave a Comment