वोडाफोनने आणला जबरदस्त प्लान


नवी दिल्ली : वोडाफोनने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. फ्री रोमिंगची सुविधा असलेला हा अनलिमिटेड सुपर प्लान १७६ रुपयांचा असून याबाबत माहिती देताना मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वोडाफोन इंडियाचे व्यवसाय प्रमुख मोहित नरुला यांनी सांगितले की, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कल भारतातील दुसरा सर्वात मोठा आहे.

इतर सात राज्यांशी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्यामुळे इतर राज्यात या राज्यातून जाणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. वोडाफोनचा नवा सुपर प्लान यामुळे ग्राहकांसाठी रोमिंग फ्री आणि मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन देत आहे. ग्राहकांना या सुविधेचा मोठा फायदा होईल.

केवळ १७६ रुपयांत वोडाफोन रोमिंगवर अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्सची सुविधा देत आहे. २८ दिवसांसाठी याची वैधता असणार आहे. ग्राहकांना या काळात दररोज १जीबी २जी इंटरनेट सुविधा मिळणार आहे. केवळ मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील प्री-पेड ग्राहकांसाठीच वोडाफोनचा हा प्लान असणार आहे. हा प्लान खासकरुन रोमिंग लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे.

Leave a Comment