मिनिटांमध्ये जाणून घ्या पीएफ बॅलन्स; हे आहेत चार सोपे पर्याय


जर तुम्ही नोकरदार आहात तर तुमच्या पगारातील काही हिस्सा प्रॉव्हिडंट फंड खात्यात प्रत्येक महिन्यात जमा हॉट असेल. पीएफच्या नावावर तुमच्या पगारातून दर महिन्याला किती रक्कम कापली जात आहे हे आता तुम्ही अवघ्या काही मिनिटात जाणून घेऊ शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) ने यासाठी पेपरलेस सुविधा बनविली आहे. आपल्या सर्व सदस्यांना कोणत्याही वेळी पीएफ बॅलन्सची माहीत करून घेण्याची सुविधा ईपीएफओने दिली आहे. आता आपण जाणून घेऊ या काही मिनिटांमध्ये आपल्या पीएफ शिल्लक कशा पद्धतीने जाणून घेता येईल.

ईपीएफओ पोर्टलवर: आपण ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन आपल्या पीएफ बॅलन्सची तपासणी करू शकता. तुम्हाला www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे आपण ‘Our Services’ वर जा आणि ‘For Employees’ वर क्लिक करा त्या नंतर उघडलेल्या पृष्ठावर आपल्याला पासबुक पर्याय निवडावा लागेल.

पण हे करताना एक लक्षात ठेवा की जर तुमचा यूएएन नंबर सक्रिय असले आणि त्यानंतर तो तुमच्या पीएफ खात्याशी लिंक केला असेल तरच हे शक्य होणार आहे. नवीन पृष्ठ उघडल्यास तुम्हाला आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमच्या खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेची माहिती मिळेल.

अॅपद्वारे: तुम्ही मोबाइलद्वारे देखील पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला m-epf हे अॅप डाउनलोड करू शकता. याशिवाय, आता तुम्ही UMANG अॅपद्वारे आपल्या पीएफ शिल्लक विषयी माहिती मिळवू शकता.

अॅपद्वारे शिल्लक जाणून घेण्यासाठी आपल्याला अॅपवरील सदस्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला बॅलेंस / पासबुकवर क्लिक करणे आवश्यक आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल. आपण ही महत्त्वपूर्ण माहिती भरताच, तुमच्या समोर तुम्हाला पीएफमध्ये जमा रक्कमेचा तपशील मिळेल.

मिस्ड कॉल देऊन : आपण मिस्ड कॉल देऊन आपल्या पीएफ खात्याची माहिती देखील घेऊ शकता. यासाठी 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. तुम्हाला त्यानंतर तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक माहिती मिळेल. तथापि, हे लक्षात ठेवा की हे कॉल आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच केला पाहिजे. त्याच अन्य कोणत्याही मोबाईल नंबरवरून तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकत नाही.

एसएमएसद्वारे: पीएफ बॅलन्स जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे एसएमएस पाठविणे. ईपीएफओसोबत नोंदणीकृत नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल.

एसएमएसचे एक निश्चित स्वरूप असून तुम्हाला यामध्ये EPFOHO UAN ENG लिहावे लागेल. शेवटचे तीन शब्द (ENG) म्हणजे भाषा. जर तुम्ही हे तीन शब्द वापरले तर आपल्याला उर्वरित माहिती इंग्रजीमध्ये मिळेल. तुम्ही हिंदी भाषा कोड प्रविष्ट केल्यास, तुम्हालाला त्याच भाषेत माहिती दिली जाईल.

लक्षात ठेवा UAN च्या जागी तुम्हाला यूएएन नंबर टाकायचा नाही. फक्त UAN लिहून सोडून द्या. ईपीएफओशी जोडलेला आपल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या पीएफ खात्याची आवश्यक माहिती मिळेल. त्यामुळे आपण नेहमीच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठवला पाहिजे.

Leave a Comment