महागणार टोयोटा, होंडा कार्स, स्कोडा, इसुजु, टाटाच्या कार


नवी दिल्ली – जानेवारीपासून प्रवासी प्रकारातील कारच्या किमती महागतील असे टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले असून २५ हजार रुपयांपर्यंत कारच्या किमती उत्पादन खर्चात वाढ झाल्याने वाढणार आहेत. हा निर्णय बदलती बाजारपेठ, उत्पादन खर्चात वाढ, आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार कारच्या किमती वाढविण्याचा घेण्यात आला. टोयोटा, होंडा कार्स, स्कोडा, इसुजु या कारच्या किमती जानेवारीपासून वाढविण्याचा निर्णय अगोदरच जाहीर करण्यात आला आहे. कारच्या किमती वाढविण्याचा कोणताही विचार नसल्याचे मारुती सुझुकी आणि हय़ुंडाई मोटारने म्हटले आहे. आपल्याकडील साठा संपविण्याचा प्रयत्न कार कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment