मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत १०९ व्या स्थानी


नवी दिल्ली – वर्षभरात देशातील ४जीची सेवा वेगाने विस्तारली असली तरी भारताला इंटरनेटच्या वेगाच्या बाबतीत जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही स्थान मिळाले नसल्याची माहिती इंटरनेटचा वेग पडताळून त्याबद्दलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या ओक्ला या संस्थेने दिली आहे. नॉर्वे या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

भारत मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात १०९ व्या क्रमांकावर आहे. तर भारत ब्रॉडबँड स्पीडमध्ये ७६ व्या स्थानी आहे. भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी वेग २०१७ च्या सुरुवातीला ७.६५ एमबीपीएस (मेगा बाईट पर सेकंद) एवढा होता. पण इंटरनेटच्या वेगात वर्षाच्या अखेरपर्यंत वाढ झाली. भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड नोव्हेंबरमध्ये ८.८० एमबीपीएस एवढा होता, अशी ओक्लाची आकडेवारी सांगते. वर्षाच्या सुरुवातीचा इंटरनेट स्पीड लक्षात घेतल्यास इंटरनेटच्या वेगातील वाढ १५ टक्के ऐवढी आहे. मोबाईल इंटरनेटचा नॉर्वेमध्ये स्पीड सर्वाधिक (६२.६६ एमबीपीएस) आहे. यानंतर नेदरलँड्स (५३.०१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि आईसलँड (५२.७८ एमबीपीएस) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment