७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान शाओमीची खास ऑफर


आपल्या ‘एमआय ए वन’ स्मार्टफोनची किंमत शाओमीने कमी केली असून तुम्हाला हा १४ हजार ९९९ रुपयांना मिळणार फोन आता १२ हजार ९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. पण शाओमीकडून ही खास ऑफर फक्त तीन दिवसांसाठी देण्यात आली असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटबरोबरच फ्लिपकार्टवर या विशेष किंमतीमध्ये हा फोन ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान उपलब्ध असणार आहे.

अॅण्ड्रॉइड ७.१.२. नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर ‘एमआय ए वन’ हा काम करतो. पण अॅण्ड्रॉइड ८.० म्हणजेच अॅण्ड्रॉइड ओरियओची मोफत अपडेट कंपनीने याफोनमध्ये दिली असून फूल एचडी ५.५ इंचांची २.५ डी गोरिला ग्लास प्रकारची स्क्रीन या फोनला आहे. संपूर्ण स्टील बॉडी असणारा हा फोन आकर्षक दिसतो. कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरवर हा फोन काम करतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट मेमरी असणाऱ्या या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Comment