भारतात दाखल झाली टीव्हीएसची ‘अपाची आर आर ३१०’ गाडी लाँच


मुंबई : भारतात टिव्हीएसने ‘अपाची आर आर ३१० गाडी लाँच केली असून २.०५लाख(एक्स शोरूम किंमत)इतकी या गाडीची किंमत आहे.

ही स्पोर्ट बाईक असल्यामुळे ही बाईक तरूणाईला आकर्षित करणारी आहे. या बाईकच्या बुकिंगला या महिन्याअखेर पर्यंत सुरूवात होणार आहे. ३१२सीसीचे इंजिन या गाडीमध्ये देण्यात आले असून यात ३३.५ बीएच पॉवर आणि ७७०० आरपीएम टॉर्क आहे. ३००एमएम पेटल फ्रंट डिस्क ब्रेक व २४०एमएम रेअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. या गाडीची स्पर्धा केटीएम ३९० डय़ूक, केटीएम आरसी ३९० आणि बेनेली ३०२ आर यांच्याशी असणार आहे. ही गाडी लाल आणि काळा या दोन रंगात उपलब्ध आहे.

Web Title: TVS 'Apache RR 310' launch in India