गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर पडतो अधिक ताण


सध्या आपण इंटरनेटच्या मायाजालावर विविध माहिती मिळविण्यासाठी गुगल या जायंट सर्च इंजिनचा सर्रास वापर करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर अधिक ताण पडून स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. असे आम्ही नाहीतर ब्रिटनमधील संशोधक म्हणत आहेत.

सध्या हे संशोधक आपल्या स्वत:वरच याचा प्रयोग करत असून मेंदूच्या आरोग्यासाठी त्याला चालना देणे योग्य असले तरी ब्रिटनमधील सेंट अँन्ड्रयु विद्यापीठातील अभ्यासक फ्रँक गन मूर सध्या इंटरनेटचा वाढता वापर काळजी वाढविणारा असल्याचे म्हणाले.

आपल्याला एखाद्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सरळ टाईप करतो www.google.com. किंवा ती माहिती वाचलेली असल्यास आठवण्याचा प्रयत्न करतात, असेही निरीक्षण मूर यांनी नोंदविले. स्मृतीभ्रंशाचा विकार गुगलचा किंवा मेंदूला ताण देण्यामुळे कसा उद्भवू शकतो, सध्या याबाबत संशोधन सुरू असून त्याचे परिणाम शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, मूर म्हणाले. मूर यांनी याबाबतची माहिती स्कॉटलंड येथील वार्षिक कार्यक्रमात बोलताना दिली. जगभरात स्मृतिभ्रंशाचा विकार झालेल्यांची संख्या २०१५मध्ये ४५ दशलक्ष होती.

Web Title: Google's overuse causes more stress on the brain