
नवी दिल्ली : सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये ४जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम असून रिलायन्स जिओचा सप्टेंबर महिन्यात डाऊनलोड स्पीड २१.९ एमबीपीएस होता. तर ३जीमध्ये वोडाफोन अव्वल स्थानी आहे. त्याचा स्पीड २.९ एमबीपीएस होता. दूरसंचार नियामक ट्राईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहीतीनुसार ४जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओ नंबर १ कंपनी ठरली आहे.
इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम
रिलायन्स जिओ गेल्या नऊ महिन्यापासून सतत अव्वल स्थानी असून जिओचा ऑगस्टमध्ये डाऊनलोड स्पीड १८.४ एमबीपीएस होता. तर ४जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये वोडाफोन दुसऱ्या स्थानी होता. त्याचा डाऊनलोड स्पीड ७.५ एमबीपीएस होता. पण जिओ वगळता इतर कंपन्या त्यात सातत्य राखण्यास काहीशा कमी पडल्या. कारण पुर्वीपेक्षा त्यांचा स्पीड काहीसा कमी पडला.
