मुंबई : बिटकॉईनबाबत सध्या देशातील गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढले असून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना बिटकॉइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नका, रिझर्व्ह बँकेचा सल्ला
यापूर्वीही आरबीआयने बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सांगितले होते. बँकेने त्यावरुनच पुन्हा गुंतवणुकदरांना बिटकाईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे . बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉईनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान, एका बिटकॉईनचे मूल्य गेल्या आठवड्यात तब्बल ११ हजार डॉलर्सवर पोहोचल्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून बिटकॉईनचे नियंत्रण होत नाही.