मुंबई : बाईक उत्पादक कंपनी यामाहाने आपली शानदार वायझेडएफ-आर १ २०१८ ही बाईक भारतामध्ये लॉन्च केली असून या बाईकची दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये किंमत २०.७३ लाख एवढी असून ही बाईकही यामाहाच्या मागच्या व्हर्जनप्रमाणेच दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. टेक ब्लॅक आणि यामाहा ब्लू असे दोन रंग या बाईकचे असणार आहेत.
यामाहाने भारतात लॉन्च केली वायझेडएफ-आर १ २०१८
वायझेडएफ-आर १ २०१८मध्ये एलईडी डीआरएल्स, हेडलॅम्प, ९९८ सीसी क्रॉस प्लेन, चार सिलेंडर, फोर व्हेल्ह इंजिन, मॅग्नेशियम रियर फ्रेम, मॅग्नेशियम व्हील्स, क्विक शिफ्ट सिस्टीम देण्यात आले असून विशेष म्हणजे या गाडीचा गिअर क्लचशिवाय बदलता येणार आहे.