महिंद्राची एक्सयुव्ही ५०० देणार जीप कंपासला टक्कर


मुंबई : महिंद्राने आपल्या ग्राहकांसाठी आपली शानदार एक्सयुव्ही ५०० ही गाडी लॉन्च केली असून पेट्रोलवर चालणा-या या गाडीत सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये उपलब्ध होणार आहे. महिंद्राची ही ‘GAT’ व्हेरियंट असणारी गाडी १५.४९ लाख रुपयांना मिळणार आहे.

सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सबरोबरच २.२ लिटरचं पेट्रोल इंजिन या गाडीत देण्यात आले आहे. महिंद्राच्या डिझेल गाडीप्रमाणेच हे इंजिन असेल. महिंद्रा एक्सयुव्ही ५०० पेट्रोलचे फिचर्स एक्सयुव्ही ५०० डिझेलप्रमाणेच आहेत.

७.० इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टिम(अॅन्ड्रॉईड ऑटोसह), क्रुज कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि 8 वे ऍडजस्टेबल ड्रायवर सीट महिंद्रा एक्सयुव्ही ५०० पेट्रोलमध्ये असणार आहे. सुरक्षेसाठी गाडीत रोलओव्हर मिटीगेशन(इएसपीसह), ड्युअल एअरबॅग्स असतील. २०१८ या वर्षामध्ये जीप कंपासला महिंद्रा एक्सयुव्ही ५०० पेट्रोलही गाडी टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.

Leave a Comment