हुवाईचे हॉनर ७ एक्स आणि हॉनर व्ही १० भारतीय बाजारात


मुंबई : हुवाई कंपनीने आपल्या हॉनर श्रेणीतील दोन स्मार्टफोन लॉन्च केले असून लवकरच भारतीय बाजारापेठेत हॉनर ७ एक्स आणि हॉनर व्ही १० हे दोन स्मार्टफोन मिळणार आहेत. १२,९९९ रुपये एवढी हॉनर ७एक्स या स्मार्टफोनची किंमत असून हा फोन ७ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून भारतात उपलब्ध होईल, तर ८ जानेवारीपासून हॉनर व्ही१० हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध होईल.

हॉनर ७ एक्समध्ये ड्युअल कॅमेरा, अॅण्ड्रॉईड ७.० नोगट, हुवाईची कस्टम ईएमयुआई स्क्रीन, मेटल डिझाईन, १८.९ डिस्प्ले, ५.९ इंच स्क्रीन त्याचबरोबर १६ मेगापिक्सलचा रिअर सेन्सर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर कॅमेरा तर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आले आहेत. उद्यापासून अॅमेझॉनच्या साईटवर दुपारी १२ पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

हॉनर व्ही१०मध्ये ५.९९ इंच फूल एचडी डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा अॅण्ड्रॉईड ८.० ओरिओ, २० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ६जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी जी २५६ जीबीपर्यंत एसडी कार्ड वापरून मेमरी वाढवता येणार आहे. त्याचबरोबर ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी, हायब्रिड सिम स्लॉट या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.

Leave a Comment