
न्यूयॉर्क : एक नवीन सॉफ्टवेअर संशोधकांनी विकसित केल्यामुळे अवघ्या काही मिनिटात व्यक्तीच्या डीएनए आणि सेल्सची ओळख करता येईल. यासंदर्भात ‘ईलाइफ’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार कॅन्सरच्या पेशींचे निदान करण्यास याचा सर्वाधिक उपयोग होईल.
आता अवघ्या काही मिनिटात करत येणार डीएनए टेस्ट!
याबाबत अधिक माहिती देताना अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयाचे यानीव एरलिच यांनी सांगितले की, समाजासाठी काही फायदा या सॉफ्टवेअरचा व्हावा आणि नवे तंत्रज्ञान प्रस्थापित करणे, हा यामागील उद्देश असून कॅन्सर सेल्सचे निदान करणाऱ्या क्षमता आणि नवीन उपचारपद्धतीबद्दल आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. ‘मिनआयन’वर हे सॉफ्टवेअर काम करेल.
क्रेडिट कार्डच्या आकारचे हे उपकरण असेल आणि तो त्याला असलेल्या सूक्ष्म छिद्रांमुळे वेगवेगळे डीएनए खेचून घेतो. त्यानंतर ते न्यूक्लियोटाईड किंवा डीएनएच्या अक्षरांचे ए टी सी जी असे क्रमवार विश्लेषण करते. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणुंवर आणि विषाणुंवर अभ्यास करुन हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. मात्र मानवी पेशींवर अध्ययन करण्यासाठी याच्या काही मर्यादा आहेत.
