नवी दिल्ली : गॅस एजन्सी सुरू करून तुम्ही देखील पैसे कमवू शकतात. तुम्हाला या संधी गॅस कंपन्या देत असून आपले वितरण वाढविण्याच्या दृष्टीने ऑइल कंपन्या नवीन नेटवर्क तयार करीत आहे. कंपन्यांनी २०१९मध्ये नवे ५००० वितरक वाढविण्याचे उद्दिष्ठ ठरवले असल्यामुळे तुम्हाला या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध आहे.
१० पास गॅस एजन्सी सुरू करून कमवू शकतात पैसे
२००० नवे लायसेन्स सरकारने वितरीत केले असून ३४०० आणखी लायसेन्स मार्च पर्यंत वितरीत करणार आहे. एका ड्रॉमध्ये नुकतेच ६०० जणांना निवडण्यात आले आहे. लायसन्स मिळाल्यावर सुमारे एक वर्षात नवीन गॅस एजन्सी सेट अप करायला लागते. अनेक ठिकाणी यात मंजुरीची गरज असल्याने एवढा कालावधी लागत असतो. यातील जास्त संधी महाराष्ट्र, यूपी, बिहार, बंगाल, उडीशा येथील नागरिकांना आहे.
देशातील तीन सरकारी कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी डीलर बनविण्यासाठी जाहिरात आणि नोटिफिकेशन जारी केले आहे. ५००० वितरकांचे जाळे २०१९ पर्यंत निर्माण करणार असल्यामुळे या एजन्सी संदर्भात जाहिरातींवर लक्ष ठेवणे गरजचे आहे. याची जाहिरात विविध वर्तमानपत्र आणि या तीन कंपन्यांच्या वेबसाईटवर झळकणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी पद्धतीने वितरक निवडला जाणार आहे. प्रलॉटरीमध्ये नाव आल्यावर विजेत्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलविण्यात येणार आहे. गॅस एजन्सी उघडण्यासाठी यापूर्वी शैक्षणिक पात्रता पदवी असणे गरजेचे होते. पण आता ही पात्रता कमी करत १० पास करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑइल कंपन्यांनी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आता ६० वर्षापर्यंतच्या व्यक्ती अर्ज कर शकणार आहे. यापूर्वी एलपीजी डिस्ट्रीब्यूशन २१ ते ४५ वर्षांची वयोमर्यादा होती.
फॅमिली यूनिटच्या व्याख्येत आता कंपन्यांनी विस्तार केला असून पती किंवा पत्नी, पालक, भाऊ, बहिणसह सावत्र भाऊ आणि बहिण, मुलांसह दत्तक घेतलेले मुलं, जावई आणि वहिनी, सासू- सासरे आणि आजोबा आजींना या लिस्टमध्ये अर्जशिवाय सामील करण्यात आले आहे. फॅमिली यूनिटमध्येयापूर्वी केवळ अर्ज करणारा पती-पत्नी, अविवाहित मुले येत होते.