पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सुपरहिट


मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर फॉलोअर्स वाढले असून ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता ३७.५ कोटी युजर्स ट्विटरवर फॉलो करतात. मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येत गेल्या एक वर्षात जीएसटी, मन की बात, राष्ट्रपती निवडणूक आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती असे हॅशटॅग टेंड्रिंग असतानाही ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ट्विटर इंडियाचे तरनजीत सिंह यांना २०१७मध्ये सगळ्यात जास्त चर्चेच्या विषयांवर विचारला असता ते म्हणाले, नंबर एकची जागा अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायम ठेवली असून मोदींबरोबर टॉप १० लिस्टमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे क्रिकेट स्टार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि ए.आर रहमान हे कलाकार टॉप १०च्या या यादीतून बाहेर गेले आहेत. अभिनेता अक्षय कुमारच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली असून २०१७मध्ये त्याने आमिर खानला मागे टाकले आहे.

Leave a Comment