आता प्रमुख शहरांत लवकरच सायकल सुविधा सुरु करणार ‘ओला’


बेंगळूर – काही स्टार्टअप कंपन्यांची मदत घेत सायकल सेवा सुरू करण्याच्या योजनेवर अॅप आधारित कॅब सेवा पुरविणारी ओला कंपनी काम करत आहे. ओला पेडल नावाने सायकल भाडय़ाने देण्याच्या सेवेची चाचणी आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये सुरू आहे. कंपनीकडून या परिसरात ५०० ते ६०० सायकल ठेवण्यात आल्या आहेत. ओलाच्या अॅपवरून येथील विद्यार्थी ज्या प्रकारे टॅक्सी बुक करता येते, त्याप्रमाणे सायकल सेवेचा लाभ घेतात.

कंपनीकडून प्रायोगिक पातळीवर चाचणी घेण्यात येत असून लवकरच अत्याधुनिक मॉडेल दाखल करण्यात येईल. तरुणांमध्ये लोकप्रिय असे मॉडेल सादर करण्याचा प्रयत्न असेल. क्यूआर कोड व जीपीएस टॅकिंगची व्यवस्था कंपनीकडून देण्यात येईल. ओला पेडल सेवा विद्यापीठ परिसर व शहरांमध्ये सुरू करण्याचा ओलाचा प्रयत्न राहणार आहे. बंगळूरूमध्ये युलू ही स्टार्टअप कंपनी चालू महिन्यात जीपीएस, ब्लुटुथच्या आधारे सायकल सेवा सुरू करणार आहे.

Leave a Comment