जिओने आणले दोन नवे धमाकेदार प्लान


मुंबई : अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे रिलायन्स जिओच्या एंट्रीनंतर अक्षरश: दणाणणे होते. इतर टेलिकॉम कंपन्यांनी त्यानंतर अनेक नवनवे प्लान आणले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लान आणले आहेत.

जिओच्या डेटा क्रांतीनंतर टेलिकॉम सेक्टरमधील इतर कंपन्यांनी देखील नवनव्या ऑफर आणल्यामुळे जिओने आता पुन्हा एकदा हायस्पीड इंटरनेटचे नवे धमाकेदार प्लान लाँच केले आहेत.

याबाबत जिओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लानमध्ये फ्री अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल, मेसेज आणि फ्री रोमिंग मिळणार आहे. ९८ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळणार आहे. दोन जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ केबीपीएस होईल. या प्लानची वैधता ४९ दिवसांसाठी असणार आहे.

त्याचबरोबर जिओच्या दुसऱ्या म्हणजेच ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. या प्लानमध्ये ८४ जीबीपर्यंत डेटा मिळणार असून याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे.

(विशेष टीप : जिओ कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन या प्लाननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लान तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री करा.)

Leave a Comment