एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि डोंगलच्या किंमतीत केली कपात


मुंबई : आता एअरटेलदेखील रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले असून ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगलच्या किंमतीमध्ये आता एअरटेलने कपात केली आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये रिलायंस जिओने एम२एस राऊटरच्या किंमतीत कपात केली होती. त्यानंतर आता एअरटेलनेदेखील आपल्या ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगलच्या किंमतीमध्ये ५० % कपात केली आहे. या दोन्ही आघाडीच्या कंपन्यांनी कपात केल्यानंतर आता टेलिकॉम क्षेत्रामध्ये हॉटस्पॉटचा मुकाबला सुरू होणार आहे.

एअरटेल ४ जी हॉटस्पॉटची किंमत १९५० रूपये होती. आता यामध्ये ५० % कपात केल्याने केवळ ९९९ रूपयांमध्ये हा हॉटस्पॉट मिळणार आहे. एअरटेलचा डोंगल ३००० रूपयांमध्ये उपलब्ध होता. आता ग्राहकांना तो अवघ्या १५०० रूपयांमध्ये मिळणार आहे. एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट ९९ रूपयांमध्ये उपलब्ध केले आहे. ही ऑफर सुरूवातीला केरळमध्ये उपलब्ध होती. पण नुकसान झाल्याने त्याची किंमत पुन्हा वाढवण्यात आली. पण आता थेट जिओशी टक्कर देण्यासाठी हा खास प्लान बाजारात आणला आहे.

१९९च्या प्लॅनमध्ये एअरटेलने अनलिमिटेड कॉलिंगची सोय दिली असल्यामुळे नॅशनल आणि लोकल रोमिंगचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १९९ च्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी १ जीबी डाटा मिळणार आहे. तसेच नॅशनल आणि लोकल एसएमएसदेखील फ्री मिळणार आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटक सर्कलमध्ये हा नवा प्लान उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment