सॅमसंगने लॉन्च केला आपला लाखमोलाचा जबरदस्त स्मार्टफोन


मुंबई : सॅमसंगने आपला महाग स्मार्टफोन डब्ल्यू २०१८ चीनमध्ये लॉन्च केला असून या स्मार्टफोनमध्ये एक एफ/१.५ एपर्चर देण्यात आला आहे. जो कोणत्याही फोनमध्ये दिला जाणाऱ्या फोनपेक्षा सर्वोतम आहे. १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फसाठी देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड नूगट दिले गेले आहे.

४.२ इंचचा एचडी एमोलेड डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून यामध्ये ६ जीबी रॅम असून तो क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर सोबत आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायात उपलब्ध असतील. पहिल्या स्टोरेजची मेमरी ६४ जीबी असेल तर दुसऱ्या मेमरीचा स्टोरेज २५६ जीबी असेल. सॅमसंग डब्ल्यू २०१८मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. सोबतच फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या मागच्या बाजूला आहे. या व्यतिरिक्त बिक्सबीसाठी डेडिकेटेट बटण देण्यात आले आहे. ग्लास मेटल डिझाइनसह गोल्ड प्लॅटिनम स्मार्टफोनला गोरिला ग्लास देण्यात आला आहे. सॅमसंग डब्ल्यू फ्लिप स्मार्टफोनची किंमत जवळपास १लाख ५६ हजार रुपये ऐवढी आहे.