ऑडीच्या निवडक कारवर घसघशीत सूट!


नवी दिल्‍ली : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडिया कंपनीकडून त्यांच्या काही खास मॉडल्सवर ८.८५ लाख रूपयांपर्यंतची घसघशीत सूट देण्याची घोषणा केली आहे. ऑडी रश नावाच्या या कंपनीच्या ऑफरनुसार आकर्षक सूटसोबतच ग्राहकांना परवणा-या ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे.

कंपनीने या ऑफरनुसार त्यांच्या ऑडी ए३, ऑडी ए४, ऑडी ए४ आणि ऑडी क्यू३ या चार मॉडेलवर आकर्षक डिस्काऊंट आणि सोप्या ईएमआयची ऑफर दिली आहे. याबाबत माहिती देताना ऑडी इंडियाने म्हटले आहे की, तीन लाख रुपये ते ८.८५ लाख रूपयांपर्यंत सूट या निवडक मॉडल्सवर दिली जात आहे. त्याचबरोबर ग्राहक आपली आवडती गाडी २०१७ मध्ये खरेदी करून त्याचे पैसे २०१९ पासून देण्याचा पर्याय निवडू शकतात. ही ऑफर लिमिटेड असून ही ऑफर देशातील सर्वच ऑडी डिलरकडे उपलब्ध असणार आहे.

कंपनीने या मॉडेल्सवर डिस्काऊंट दिल्यानंतर नवीन किंमत जारी केली आहे. डिस्काऊंटनंतर ऑडी ए३ या कारची किंमत २६.९९ लाख रूपये झाली आहे. ऑडी ए४ ची किंमत ३३.९९ लाख रूपये, ऑडी ए६ ची किंमत ४४.९९ लाख आणि ऑडी क्‍यू ३ ची किंमत २९.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. ऑडी रश ऑफर केवळ पेट्रोल व्हेरिएंटवरच लागू असणार आहे.

Leave a Comment