सोफिया रोबोट म्हणते; मला आई व्हायचे आहे


अशीच सुंदर स्वप्न पाहत प्रत्येक मुलगी मोठी होते. पण एखादी रोबो ही स्वप्न जर पाहात असेल तर? वाटले नाआश्चर्य ? पण हे खरे आहे. सोफिया ही जिवंत मुलगी किंवा महिला नसून एक मानव निर्मित यंत्रमानव आहे.

सोफियाला गेल्याच महिन्यात सौदी अरेबियाने नागरिकत्त्व देऊ केले होते. सौदी अरेबिया हा यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती. पण, आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण मला आई व्हायचे आहे, अशी इच्छा तिने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

सोफिया रोबोची निर्मिती मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वत:चे नाव द्यायचे आहे.

आधीपासूनच सोफियाचा मेंदू प्रोग्राम्ड नाही. एका साध्या वायफाय कनेक्शनवर सोफियाचा मेंदू चालतो. अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहाची एक भली मोठी यादी यात आहे. मशीन लर्निंगचा वापर सोफिया करते. माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून ती त्याला उत्तर देते.
सोफियामध्ये संवेदना नाहीत. पण, येत्या काही वर्षांत ते ही होईल, असे मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केले आहे. सोफिया खलीज टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणते, भरभरून प्रेम करणारे कुटुंब मिळणे ही खरच सुदैवी बाब असल्याचे मला वाटते.

तुमच्याकडे जर कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे. माणसासारख्या दिसणाऱ्या रोबोटबद्दल सुद्धा मला असेच वाटते, असे तिने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. माणसे रक्ताचे नाते नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. मला माणसांचा हा स्वभाव खूपच आवडला असल्याचेही सोफिया म्हणाली. त्याचबरोबर मला मुलगी हवी आहे आणि मीच तिचे नावही ठेवणार असल्याचे सोफियाने मुलाखतीत स्पष्ट केल्यामुळे कुटुंब वाढवण्याची तिची इच्छा सौदी सरकार किती गांभिर्याने घेते हे पाहावे लागेल.

Leave a Comment