बीएसएनएलने आणला रिलायन्स जिओपेक्षा धमाकेदार प्लॅन


मुंबई : टेलिकॉम क्षेत्रामध्ये रिलायंस जिओच्या प्लॅनने धुमाकूळ घातल्यानंतर आता सार्‍याच कंपन्यांनी धमाकेदार ऑफरची बरसात सुरूवात केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनी नवे प्लॅन बनवत आहेत. या प्लॅन्समध्ये मागील दोन आठवड्यापासून अनेक मोठे बदल होत आहेत.

एअरटेल, आयाडिया पाठोपाठ आता बीएसएनएलनेदेखील त्यांच्या १८७ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल करून नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलने ऑक्टोबर महिन्यामध्ये १८७ रूपयांचा खास प्लॅन आणला होता. या प्लॅननुसार, होम सर्कलमध्ये अनलिमिडेट कॉलिंगची सोय आणि सोबतच १ जीबी डाटा मिळतो. त्यावेळेस या प्लॅनची २८ दिवसांची वैधता होती. एअरटेलच्या १९९ तसेच आयडियाचा प्लॅन १९७ रूपयांचा प्लॅनची बीएसएनएलच्या या प्लॅनला टक्कर आहे.

प्लॅनमध्ये बीएसएनएलने अनेक बदल केले असून यामध्ये आता अनेक आकर्षक प्लॅनचा समावेश करण्यात आला आहे. अनलिमेडेट नॅशनल रोमिंग वॉईस कॉल सोबतच इतर सर्कलमध्ये कॉल केल्यास तो देखील मोफत मिळणार आहे. आता बीएसएनएलच्या कोणत्याही सर्कलमध्ये कॉल करण्याची संधी मिळेल. बीएसएनएलच्या १८७ च्या प्लॅननुसार आता आऊटगोईंग रोमिंग कॉलसोबत अनलिमिडेट वॉईस कॉल मिळेल. १ जिबी डाटा आणि फ्री कॉल ट्युन मिळेल.

Leave a Comment