मंगळावरील मानवी वस्तीचे स्वप्न होणार साकार


लंडन – नेदरलँडच्या संशोधकांना नासाने मंगळावरील आणलेल्या मातीत गांडुळाची वाढ होत असल्याचे आश्चर्यजनकरीत्या आढळून आले असून मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठीच्या प्रयत्नांना या संशोधनामुळे आणखी चालना मिळणार आहे.

मंगळावरील मातीत गांडुळ सक्रीय असल्याचे वेगेनीनजेन युनिर्व्हसिटी व रिसर्चचे वीगर वॅमेलिंक यांनी म्हटले. ते म्हणाले, की मंगळावर शेती करणे आवश्यक आहे. त्यासाठी गांडूळ उपयोगी ठरणार आहेत. खत टाकल्याचा एवढा चांगला परिणाम अपेक्षीत नव्हता.

फक्त पृथ्वीवरीलच गांडूळ नव्हेतर मंगळावरील जमिनीचे पोषणासाठी महत्त्वाची भूमिका पार पडणार असल्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. मंगळावरील मातीत गांडुळही तग धरू शकत नसल्याने मानवालाही मंगळावर जिवंत राहण्याच्या दृष्टीने आता अधिक संशोधन केले जाणार आहे.

Leave a Comment