आता अ‍ॅमेझॉन अकांऊटसोबतही लिंक करावे लागणार आधार !


नवी दिल्ली : सरकारी कामांसोबतच आता वैयक्तिक सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली असून आपल्या ग्राहकांना ई-कॉमर्स सेक्टरमधील मोठी कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने त्यांच्या अ‍ॅमेझॉन अकांऊटसोबत आधार लिंक करण्यास सांगितले आहे. अ‍ॅमेझॉनकडून सांगण्यात आले आहे की, कोणतही हरवलेले पॅकेज वेबसाईटवर आधार लिंक केल्याने सहज शोधले जाऊ शकते.

यासंदर्भातील बजफिड न्यूजने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एका ग्राहकाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, आधार अनेक गोष्टींसाठी अपलोड करण्यासाठी सांगितले जात आहे. दरम्यान अ‍ॅमेझॉनकडून ग्राहकांना सांगण्यात येत आहे की, वेबसाईटवर आधारची कॉपी अपलोड न केल्यास कोणतीही समस्या आल्यावर ती सोडवण्यास उशीर लागू शकतो. सरकारने आधीच वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी आधार सक्तीचे केले असताना आता अ‍ॅमेझॉनने हा निर्णय घेतला आहे.

तुम्ही जर अ‍ॅमेझॉनला तुमच्या आधारचा तपशील दिला नाही तर कोणतीही समस्या सोडवण्याची शाश्वती घेतली जाणार नाही. तुमच्याकडे जर आधार नसेल आणि अशात तुमची एखादी ऑर्डर हरवली तर अ‍ॅमेझॉन तुमच्या इतर आयडी प्रूफच्या आधारे ऑडर्स शोधण्याचा प्रयत्न करेल. पण यामुळे ते शोधण्यात उशीर होऊ शकतो. इतकेच नाहीतर बजफिडच्या बातमीनुसार आधार ज्या ग्राहकांनी लिंक केले नाहीत त्यांच्या तक्रारीही अ‍ॅमेझॉन घेत नाही.

Leave a Comment