म्युझिक व्हिडीओमध्ये केळी खाणे ‘या’ गायिकेला पडले महागात


हे ऐकून आश्चर्य वाटेल पण खरे आहे. हा प्रकार इजिप्शियन गायिका शायमा हिच्यासोबत झाला आहे. हा एक म्युझिक व्हिडिओ असून ज्यात इजिप्शियन गायिका शायमा एका शिक्षिका बनली आहे आणि ती विद्यार्थांसमोर अत्यंत मादक पद्धतीने केळे खाताना दिसत होती.

एवढेच नाही, तर या गाण्यातही दाखविले गेले आहे तिचे विद्यार्थीदेखील याचे अनुसरण करतात. परंतु, हा व्हिडिओ इजिप्शियन समाजासाठी हानीकारक ठरवत शायमाला अटक करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की या प्रकरणात तिला तीन वर्षे शिक्षा सुनावली जाऊ शकते. या व्हिडिओमध्ये शायमाने एक चड्डी निकर घातलेली आहे, ते देखील चुकीचे आहे. एवढेच नाही, तर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. गायिकाचे खरे नाव शायमा अहमद आहे.

२१ शायमाने याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, मी लोकांची या व्हिडीओबद्दल माफी मागते, ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या व्हिडिओमुळे इजिप्तमध्ये सध्या गोंधळ सुरु आहे. इजिप्तमध्ये या व्हिडीओवरून असे म्हटले जात आहे की तो व्हिडीओ समाजाला योग्य संदेश देत नाही आणि भावनांना उत्तेजन देतो. तथापि, हा व्हिडिओ युट्युबवर काढून टाकण्यात आला आहे.

Leave a Comment