भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार फेसबुक


नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी डिजिटल स्किल्सना डेव्हलप करण्याची योजना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आखली आहे.

फेसबुकने यासाठी भारतात डिजिटल ट्रेनिंग हब आणि स्टार्टअप ट्रेनिंग हब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक याद्वारे देशात ऑनलाईन माध्यमातून लहान बिझनेस आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल स्किल्स शिकवण्यास मदत करेल. अशा हबची भारतात पहिल्यांदाच सुरूवात होणार आहे.

https://digitalskills.fb.com ही वेबसाईट डिजिटल ट्रेनिंगसाठी आणि https://startups.fb.com ही वेबसाईट स्‍टार्टअप ट्रेनिंगसाठी तयार करण्यात आली आहे. तुम्हाला यात तुमच्या गरजांनुसार माहिती मिळेल. २०२० पर्यंत भारतात ५ लाखांपेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणे फेसबुकच्या या योजनेचा उद्देश आहे.

लोकांना डिजिटल स्किल्स आणि ट्रेनिंग फेसबुकचे ऑनलाईन ट्रेनिंग हब देणार आहेत. सोबतच होतकरू उद्योजकांना बिझनेस सुरू करण्यासाठी आणि सुरू असलेल्या व्यवसायांना इंटरनेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यास फेसबुकचे ऑनलाईन ट्रेनिंग हब मदत करेल. आपल्या या योजनेसाठी फेसबुकने डिजिटल विद्या, ईडीआयआय, धर्मा लाईफ आणि स्टार्टअप इंडिया सारख्या स्थानिक कंपन्यांसोबत मिळून अभ्यासक्रम तयार केला आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा अभ्यासक्रम मोबाईलवर उपलब्ध होईल.

लोकांना सोशल मीडिया बेसिक्स, डिजिटल चॅनलवर ऑडिअन्स तयार करणे, पर्सनल ब्रॅन्डींगसारखे स्किल्स फेसबुक डिजिटल ट्रेनिंग हबच्या माध्यमातून शिकवणार आहे. तसेच डेव्हलपर्स आणि टेक स्टार्टअपना चांगले प्रॉडक्ट्स, बिझनेस उभा करण्यात मदत करतील. बिझनेस प्लॅन तयार करणे, मार्केट रिसर्च, हायरिंग, फंडींग आणि बिझनेस पुढे कसा नेणार हे या अभ्यासक्रमात शिकवले जाणार आहे.

Leave a Comment