ट्विटरने बंद केली वादग्रस्त ४५ अकाऊंट्स


सॅन फ्रान्सिस्को : ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स ट्विटरने बंद केली आहेत. रशियाशी संबंध असलेल्या अकाऊंट्सच्या नेटवर्कबाबत ट्विटरला माहिती मिळाली होती, हे पाऊल त्यानंतर उचलण्यात आले. या ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंटबाबत माहिती गोळा केल्यानंतर हि कारवाई करण्यात आली.

ट्विटरवर १,५६.२५२ रशियन अकाऊंट्स डेटा वैज्ञानिकांना मिळाली. युक्रेन संघर्षापासून ते ब्रेक्सिटपर्यंतच्या विषयाबाबत या अकाऊंट्सनी ट्विट्स केली होती. १३ जूनच्या एक दिवस आधी जवळपास १ हजारांहून अधिक पोस्ट या अकाऊंट्सवरून करण्यात आल्या होत्या. यातील अनेक जण पुतिन यांचे समर्थक होते. या अकाऊंटवरून २३ ते २४ जूनदरम्यान ३९ हजार पोस्ट करण्यात आल्या होत्या. अमेरिकेत झालेल्या निवडणुकीवेळी या खात्यांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment