दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद


रिझर्व्ह बँकेने काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार गतवर्षी चलनात आणल्या गेलेल्या दोन हजारांच्या नोटा कॅश कौंटरवरून ग्राहकांना देऊ नयेत असे आदेश सर्व बँकांना दिले असल्याचे समजते. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दोन हजाराची नोट चलनातून बाद केली जाणार नसल्याचे सांगितले आहे मात्र पुढचे तीन महिने बँकांनी केवळ २०० रूपये व त्याखालच्या नोटांच ग्राहकांना द्याव्यात असे आदेश दिले गेल्याचे माहिती अधिकार चौकशीतून समोर आले आहे.

एटीएमवरील ग्राहकांचे अवलंबित्वही कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चलनी नोटा छपाई होणार्‍या सिक्युरिटी प्रिंटींग अॅन्ड मिटींग कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे माहिती हक्क अधिकार कायद्यानुसार एक माहिती मागविली गेली होती. त्याला दिलेल्या उत्तरात असे म्हटले गेले आहे की रिझर्व्ह बँकेकडून २ हजार रूपयांच्या नोटांची मागणी आलेली नाही त्यामुळे पुढील तीन महिने या नोटा छपाई बंद केली गेली आहे. त्या ऐवजी ५०० व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची छपाई केली जात आहे. पाच व दोन रूपयांच्या नोटाही छापणे बंद झाले आहे.

सध्या चलनात २ हजार व ५०० रूपयांच्या नव्या नोटा आहेत. २०० रूपयांच्या नव्या नोटा अजून पुरेशा प्रमाणात चलनात आलेल्या नाहीत. कारण एटीएममध्ये त्यासाठी आवश्यक कॅलिब्रेशन केले गेलेले नाही. त्यामुळे या नोटा ग्राहकांना कौटरवरून देण्याचे आदेश दिले गेले आहेत. एटीएममधून फक्त दोन हजार व पाचशेच्या नोटा भरण्यासंबंधीच्या सूचनाही बँकांना दिल्या गेल्या आहत. जितक्या अधिक प्रमाणात कमी मूल्याच्या नोटा चलनात येतील तितका काळा पैसा निर्मितीला आळा बसेल या उद्देशाने रिझर्व्ह बँकेकडून असे आदेश दिले गेल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment