भारतीय बाजारपेठेत बीएमडब्ल्यूने लॉन्च केल्या दोन जबरदस्त बाईक्स


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स बीएमडब्ल्यू मोटर्राडने लॉन्च केल्या आहेत. के १६०० बी आणि आर नाईन टी रेसर अशी या बाईक्सची नावे असून गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया बाईक वीक २०१७ मध्ये कंपनीने के १६०० बी आणि आर नाईन टी रेसर या दोन्ही बाईक्स लॉन्च केल्या आहेत.

बीएमडब्ल्यू मोटर्राडच्या भारतीय बाजारपेठेत के १६०० बी आणि आर नाईन टी रेसर या दोन्ही बाईक्स लॉन्च करण्यापूर्वी ११ बाईक्स आहेत.

बीएमडब्ल्यू के १६०० बी या बाईकमध्ये १६४९सीसीचे ६ सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. १६० बीएचपीची पॉवर आणि १७५एनएमचे टार्क हे इंजिन जनरेट करतं. या बाईकमध्ये रिवर्स गेअरचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय बाजारात बीएमडब्ल्यूके १६०० बी या बाईकची किंमत २९ लाख रुपये (एक्स शो रुम) ठेवण्यात आली आहे. तर बीएमडब्ल्यूआर नाईन टी रेसर या बाईकची एक्स शो रुम किंमत १७.३० लाख ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment