बंद होणार जिओची कॅशबॅक ऑफर


मुंबई : दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओने पाऊल ठेवताच इतर सर्व कंपन्यांचे धाबे दणाणले. आपले ग्राहक वाचवण्याचे आव्हान सर्व कंपन्यांपुढे येऊन ठेपले. अनेक ऑफर जिओने ग्राहकांसाठी आणत आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित केले.

आज करोडो जिओचे युजर्स असून २५ नोव्हेंबरला रिलायंस जिओची कॅशबॅक ऑफर संपणार आहे. २५९९ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर रिलायंस जिओ रिचार्जवर देत आहे. फक्त ऑनलाइन रिचार्जवर ही कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

तुम्ही जर ३९९ रुपयांचा रिचार्ज करता तर यावर तुम्हाला ४०० रुपये कॅशबॅक मिळतात. ८ वेळा ही कॅशबॅक मिळते. ३९९च्या रिचार्जनंतर पुढच्या ८ रिचार्जवर ५० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच ३९९चा रिचार्ज ३४९ रुपयांना मिळेल. ऑफरनुसार ३९९ किंवा त्यापेक्षा अधिक रिचार्जवर २५९९ रुपयांपर्यंतची ऑफर आहे. तुम्हाला ही रक्कम २५९९ रुपयांच्या कॅशबॅकमध्ये एकत्र नाही मिळत. ती वेगवेगळ्या भागात मिळते. तुम्हाला जिओ अॅपमध्ये ४०० रुपये मिळतील. मोबाईल वॉलेटमध्ये ३०० रुपये तुम्हाला मिळतील. उर्वरीत पैसे शॉपिंग वाउचरच्या रुपात मिळतील.

Leave a Comment