गूगलकडून मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना मानवंदना


मुंबई – गुगलने डुडलच्या माध्यमातून ब्रिटीशांच्या भारतीय वसाहतीमधील पहिल्या महिला डॉक्टर रुखमाबाई यांचा आज त्यांच्या जन्मदिनी सन्मान केला आहे.

भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या पहिल्या महिला डॉक्टर आहे. २२ नोव्हेंबर १८६४ ला मुंबईत रखमाबाई यांचा जन्म झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. रखमाबाईंच्या आईचे म्हणजे जयंतीबाईंचे वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झाले होते, १५ व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि १७ व्या वर्षी त्यांचे पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झाले. अवघ्या १७ व्या वर्षी जयंतीबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरे लग्न केले.

ज्यावेळी औषध अभ्यास करण्याची इच्छा रखमाबाई यांनी व्यक्त केली, तेव्हा लंडन स्कूल ऑफ मेडिसीन येथे इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रवासाला आणि अभ्यासाला पाठिंबा देण्यासाठी एक निधी तयार करण्यात आला. त्यानंतर त्या इंग्लंडला गेली आणि एक योग्य डॉक्टर म्हणून भारतात परतल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकोटच्या महिला हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे काम केले.

Leave a Comment