एअरसेल देणार १७५ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि ३० जीबी डेटा


रिलायन्स जिओला आव्हान देण्यासाठी मंगळवारी एअरसेलने एक नवीन टेरिफ प्लान आणला आहे. ही योजना कोलकाता सर्कलसाठी असून नव्या टेरिफ प्लानची सुरुवात ९३ रुपयांनी होते. ग्राहकांना योजनेअंतर्गत स्थानिक आणि एसटीडी कॉल्सवर ऑफर मिळत आहेत. इंटरनेट डेटा आणि एसएमएस संबंधित ऑफर देखील एअरसेलने काढली आहे. एअरसेलच्या कोलकाता सर्कलमधील विद्यमान आणि नवीन सदस्यांसाठी ही योजना आहे.

एअरसेलचा हा प्लान ९३ रुपयांचा असून त्याची वैधता ३६८ दिवस आहे. या पॅकमधून रिचार्ज केल्यानंतर ग्राहक एका वर्षासाठी 20 पैसे प्रति मिनिट स्थानिक आणि एसटीडी कॉल्स करू शकतील. या व्यतिरिक्त २५० एमबी डेटा दरमहा उपलब्ध असेल आणि ५० एसएमएसही मोफत असतील. या पॅकमध्ये ७० रुपयाच्या टॉकटाईमचा देखील समावेश आहे.

एअरसेलचे नवीन ग्राहक जर अमर्यादित स्थानिक आणि एसटीडी कॉल प्लान शोधत असतील तर त्यांना १७५ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. १७५ रुपयांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवस अमर्यादित व्हॉईस कॉल्स मिळतील. त्याचवेळी, समान लाभांसह ८४ दिवसांच्या वैधतेच्या प्लानसाठी ३४९ रुपये मोजावे लागतील. दोन्ही योजनांमध्ये ग्राहकांना दररोज वापरासाठी १ जीबी डेटा दिला जाणार आहे. अमर्यादित कॉलच्या व्यतिरीक्त १०० स्थानिक आणि राष्ट्रीय एसएमएसही मोफत मिळतील.

Leave a Comment