
मुंबई : भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखीन मजबूत करत वर्चस्व निर्माण करण्यासाठी शाओमी कंपनीने एक खास ऑफर सुरु केली आहे. मंगळवारी शाओमी कंपनीने एमआय एक्सचेंज प्रोग्रामची घोषणा केली आहे. ग्राहकांना या ऑफरनुसार जुना फोन एक्सचेंज करुन नवा फोन घेता येणार आहे. कंपनीने या ऑफरसाठी दिल्लीतील कंपनी कॅशीफायसोबत भागीदारी केली आहे.
शाओमीची जुना फोन द्या आणि नवा घ्या ऑफर
शाओमीचा नवा स्मार्टफोन एमआय एक्सचेंज ऑफरनुसार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपल्या जवळील एमआय होम स्टोअरमध्ये जावे लागणार आहे. कॅशीफायची टीम एमआय होममध्ये तुमच्या जुन्या फोनची किंमत ठरवेल आणि त्यानंतर तुम्हाला किंमतीनुसार नव्या फोनवर सूट देण्यात येणार आहे.
एमआय होम जाण्यापूर्वी तुम्ही आपल्या फोनची किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी www.cashify.in या संकेतस्थळावर वर जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्ही फोनची किंमत जाणून घेऊ शकता.त्याचबरोबर घरी बसूनही तुम्ही पिकअप सेवेचा लाभ घेऊ शकता. पण तुम्हाला त्यासाठी १०० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
