विवोचा बहुप्रतीक्षित V7 लॉन्च


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत चीनमधील स्मार्टफोन निर्माता किंपनी विवोने V7 हा आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. केवळ फ्लिपकार्टवर नव्या विवो V7 या स्मार्टफोनची विक्री होणार आहे. तर फोनची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशियात लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. विवो V7मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉईड नुगट ७.१, ५.७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्युशन ७२०X१४४० पिक्सल आहे. १.८GHz चा ऑक्टाकोअर क्वॉलकॉम ४५० प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे. विवो V7 मध्ये ४जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तुम्ही मेमरी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवू शकता. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा रिअर आणि २४ मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेऱ्यात मून लाईट ग्लो फिचरही देण्यात आला आहे. या फोनची किंमत १८,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment