४ सोप्या पर्यायने डिलीट करा मोबाईलमध्ये असलेले डुप्लीकेट नंबर


एखादा नवीन मोबाईल विकत घेतल्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या जुन्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्टस नवीन मोबाईलमध्ये घेण्याचे काम करतो. एखादा नवीन कॉन्टॅक्ट नंबर अनेकदा सेव्ह करताना आपण त्यातील पर्याय योग्य पद्धतीने वाचत नाही आणि एकच क्रमांक ४ वेळा सेव्ह होतो. एका फोनमधून हे कॉन्टॅक्ट दुसऱ्या फोनमध्ये घेतानाही ते एकाहून जास्त वेळा कॉपी होतात. त्यामुळे आपला फोन स्लो होतो.

याबरोबरच आपल्याला एखादा कॉन्टॅक्ट फोनमध्ये शोधायचा असेल तरीही आपल्याला बरेच स्क्रोल करावे लागते. त्यामागे एकच कारण म्हणजे ३ ते ४ वेळा एकच कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह झालेला असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा सेव्ह झालेले नंबर डिलीट करायचे म्हटले तर खूप जास्त वेळ जातो. पण आता काही सोप्या पर्यायाने आपल्याला हे कॉन्टॅक्ट एका झटक्यात डिलीट करता येतात.

यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून Duplicate Contacts Remover (डुप्लिकेट कॉन्टॅक्ट रिमूव्हर) हे मोबाईल अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. त्यामध्ये त्यानंतर पर्याय येईल त्याला अलाऊ करा. तुम्ही तसे न केल्यास ३ ते ४ वेळा सेव्ह झालेले कॉन्टॅक्ट डिलीट होणार नाहीत. अॅप ओपन केल्यानंतर आपल्या फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉन्टॅक्ट स्कॅन केल्यानंतर डिलीट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यामुळे फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉन्टॅक्ट डिलीट होतील.

Leave a Comment