लॉचिंगपूर्वीच रेडमी नोट ५ वेबसाईटवर लिस्ट


चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने त्यांच्या रेडमी नोट ४ ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर लवकरच रेड मी नोट ५ लाँच होत असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे रेडमी नोट ५ लाँच होण्यापूर्वीच त्याचे लिस्टींग वेबसाईट जेडी डॉट कॉमवर केले गेले आहे. कंपनीने अधिकृत घोषणा मात्र अद्याप केलेली नाही.

या फोनची फिचर्स लिक झाली असून त्यानुसार या फोनला ५.९९ इंची स्क्रीन दिला जाईल. क्लालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, १२ एमपीचा रियर, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड नगेट ७.१ व ४००० एमएएच बॅटरी असेल. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये म्हणजे ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज व ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध करून दिला जाईल. याची किंमत अंदाजे २४० डॉलर्स म्हणजे १४२०० रूपये असेल.

Leave a Comment