आता युरोपमार्गे होतेय सोने तस्करी


सोने तस्करांनी आता पारंपारिक अरब देशांऐवजी युरोप मार्गे तस्करीला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत असून गेल्या जानेवारी ते आक्टोबर या काळात एकट्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच सीमा शुल्क अधिकार्‍यांनी ३७ कोटींचे ११० किलो सोने जप्त केले आहे. देशातील अन्य विमानतळांवरही अवैधमार्गे आणलेले सोने जप्त हेात आहे मात्र सर्वाधिक सोने दिल्ली इंदिरा गांधी विमानतळावरूनच जप्त केले गेले आहे.

सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्कर संशयापासून सुरक्षितेसाठी युरोपिय देशांच्या मार्गाने भारतात सोने आणत आहेत. १० नोव्हेंबरला फ्रँकफर्टवरून आलेल्या जेष्ठ जोडप्याकडून साडेपंचवीस लाख रूपये किमतीचे सोने जप्त केले गेले तर त्याअगोदर लंडन वरून आलेल्या एका पुरूष प्रवाशाकडून ३० लाख रूपये किमतीचे १ किलो सोने व पॅरिसवरून आलेल्या प्रवाशाकडून ६६ लाख रूपये किमतीचे दोन किलो सोने जप्त केले गेले आहे.

गेल्या महिन्यात इटालीहून आलेल्या प्रवाशाकडून दीड किलो सोने जप्त केले गेले असून त्याची बाजारातील किंमत ४५ लाख रूपये असल्याचे समजते.