ओएनजीसीसाठी घरी बसून करा हे काम आणि मिळवा दहा लाख रुपये


नवी दिल्ली: युवावर्गासाठी अनेक आकर्षक योजनांची सुरूवात मोदी सरकारने केली असून या योजनांमध्ये सामील होऊन आपण देखील चांगले पैसे कमवू शकता. याव्यतिरिक्त, देशातील उद्योजकतेत तरुणांचे लक्ष वाढवण्यासाठी सरकार खूप काम करित आहे. या वेळी सरकारने युवकांना १८ लाख रुपये कमविण्याची मोठी जर आपण सरकारच्या वतीने मागितलेली माहितीत पूर्णतः फिट बसत असाल तर ही बक्षीस रक्कम तुमच्या खात्यात येऊ शकते. मग काय कसली वाट पाहत आहात आणि सुरु करा सरकारकडून मागितल्या गेलेल्या आयडियावर काम करणे आणि जिंका मोठे मोठे बक्षीस.

यावर्षी केंद्र सरकारकडून एकूण १८ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे तर यात पहिल्या पुरस्कारासाठी १० लाख रुपये, दुस-यासाठी पाच लाख आणि तिसऱ्यासाठी ३ लाख रुपये बक्षिसाची तरतूद करण्यात आली आहे. आपल्याला ही रक्कम जिंकण्यासाठी एक डिझाइन बनवून ती ऑनलाइन पाठवावी लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे डिझाईन कोणासाठी आणि कशासाठी बनवायचे आहे? तर आता आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

ओएनजीसीने सन २०१६मध्ये १०० कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड तयार केला होता. कंपनी या अंतर्गत ऊर्जा क्षेत्रातील युवकांकडून नवीन कल्पनांचा प्रसार करीत आहे. कंपनीने या वेळी सोलर स्टोवचे डिझाईन करणाऱ्याला बक्षीस घोषित केले आहे.

जर तुम्ही ओएनजीसीच्या योजनांमध्ये सामील होऊ इच्छित असाल तर यासाठी अंतिम मुदत १ डिसेंबर २०१७ असून संबंधित अटीनुसार स्पर्धामध्ये ओएनजीसीचे कर्मचारी, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि संबंधित तज्ञ हे भाग घेऊ शकत नाहीत.

सोलर स्टोव्ह तयार करताना ओएनजीसीने ७ वस्तूंची काळजी घेण्यास सांगितले आहे. या गोष्टींची काळजी घेणाऱ्यालाच येथे प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जे स्पर्धक या गोष्टी आपल्या डिझाईनमध्ये काळजीपूर्वक हाताळतील, त्यांची बक्षीस जिंकण्याची शक्यता सर्वाधिक असेल.

देशाच्या १२५ कोटी लोकसंख्येमध्ये सोलर गॅस स्टोव्हला पसंती मिळण्याची मोठी शक्यता असून तुमची कल्पना जर सरकारला आवडली तर प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पहिला बक्षीस आणि स्टोवची निर्मितीत आपल्या योगदानाची शक्यता जास्त आहे.

स्टोवच्या डिझाइनसाठी ओएनजीसीने काही मानके निश्चित केले आहेत. ओएनजीसी म्हणते की हे स्टोव्हचा २४ तास म्हणजे दिवस आणि रात्रीच्या कामासाठी वापरू शकतो. त्याचा उत्पादन खर्च जास्त असू नये. स्टोव्ह वर स्वयंपाक संबंधित सर्व काम केले जाऊ शकतील. स्टोववर अशा धातूचे बनलेले असणे आवश्यक आहे ज्यानंतर डिस्पोज करण्यात त्रास होणार नाही.

आपण जेव्हा संबंधित वेबसाइटवर फॉर्म ए सादर कराल तेव्हा हे फॉर्म शॉर्टलिस्ट केले जातील. यानंतर, कंपनीने तयार केलेले तज्ञ पॅनेल आपल्या कल्पनावर विचार करेल. पॅनेलमधील सदस्यांच्या सहमतीने ही कल्पना एप्रिलच्या अखेरीस पॅनेलच्या समोर ठेवण्यात येईल. ऑनलाइन माध्यमांद्वारे वेळोवेळी स्पर्धकांना याबद्दल सर्व माहिती मिळेल.

आपण संबंधित डिझाइन स्पर्धेत भाग घेऊ इच्छित असल्यास, https://startup.ongc.co.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन डिझाईन सादर करू शकता. या स्पर्धेत सामील होण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१७ आहे. या तारखेला सहभागी होणारे सहभागींना फॉर्म ए भरावे लागेल. यामध्ये आपल्याला आपल्या कल्पनेचा पूर्ण तपशील द्यावा लागेल.