५जीचा स्पीड पाहून तुम्हीही व्हाल थक्क


नवी दिल्ली : एरिक्सनने भारतात नवीन ५जी सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पहिल्यांदाच एंड टू एंड सादरीकरण केले. एरिक्सनने या सेवेची सुरुवात करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलशी भागीदारी केली आहे.

एरिक्सनच्या ५जी टेस्ट बेड आणि ५जी न्यू रेडिओ (एनआर) कडून हे सादरीकरण करण्यात आले. ज्यामध्ये अत्यंत कमी वेळेत म्हणजे ३ मिली सेकंदात ५.७ जीबी प्रती सेकंद एवढा स्पीड मिळाला आहे. भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये ५जी ची सुरुवात झाल्यानंतर २०२६ पर्यंत २७.३ अब्ज महसूल निर्माण करण्याची क्षमता असल्याचं एरिक्सनच्या अभ्यासात म्हटले आहे.

२०२० पर्यंत ५जी ची सुरुवात करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे. एरिक्सनने त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यासाठी काही दिवसांपूर्वीच सरकारने एका समितीची स्थापना केली आहे, जी ५जी सेवा भारतात आणण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करणार आहे.

आधी भारतीय टेलिकॉम क्षेत्रात २जी, ३जी आणि आता ४जीची चलती आहे. पण आता याही पुढे जात ५जी येत आहे. यासाठी स्वीडनमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या एरिक्सन कंपनीने पुढाकार घेतला आहे.

Leave a Comment