या दुकानात भुते बनवितात मिठाई


ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या राजस्थातील अजमेर येथील एक मिठाई दुकान वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीस आलेले आहे. ब्रिटीशकाळापासून सुरू असलेल्या या दुकानाचे नांव भूतिया हलवाई असे आहे व येथल्यासारखे लाडू देशात कुठेच मिळत नाहीत अशीही त्याची ख्याती आहे. या दुकानात भुते मिठाया बनवितात असे सांगितले जाते. कांहीही असले तरी येथे येणारे पर्यटक येथून मिठाई खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत असे समजते.

१९३३ साली लाला मूटचंद गुप्ता यांनी अलवर गेटजवळ हे दुकान सुरू केले. हा भाग झपाटलेला समजला जात असे. त्यामुळे येथे थोड्याफार संख्येने असलेली दुकानेही सूर्यास्ताबरोबर बंद केली जात. मूटचंद हे मात्र रात्रभर दुकान उघडे ठेवत. असे सांगतात की सकाळी मूटचंद जेव्हा दुकानात परत येत तेव्हा तेथे स्वादिष्ट मिठाईची ताटे तयार असत. ही मिठाई भूते तयार करतात असा समज झाल्याने या दुकानाचे नाव भूतिया हलवाई असे ठेवले गेले. आता मूटचंद यांचा मुलगा व नातू हे दुकान सांभाळतात.

असेही सांगतात की एकदा चोरांनी या दुकानात डाका घातला पण त्यांनीही पैसे वगैरे न चोरता लाडूच चोरून नेले होते.

Leave a Comment