
नवी दिल्ली : व्होडाफोनने पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी दोन नवे कोरे प्लॅन लॉन्च केले आहेत. जिओच्या ८४ दिवसांच्या प्लॅनला त्यापैकी व्होडाफोनचे दोन्ही प्लॅन टक्कर देणार आहेत. त्यातील पहिला प्लॅन हा ८४ दिवसांसाठी तर, दुसरा ७० दिवसांसाठी असणार आहे.
व्होडाफोन आणला ८४जीबी, ७० जीबीसह अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लॅन
८४ दिवसाच्या प्लॅनअंतर्गत व्होडाफोन आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग दिले आहे. पण त्यासाठी एक अटही ठेवली आहे. हा प्लॅन घेतल्यावर ग्राहकाला रोमिंग फ्री कॉल करता येऊ शकतो. पण, अट ऐवढीच आहे की, या प्लॅनअंतर्ग ग्राहक एका दिवसात २५० पेक्षा जास्त जास्त कॉल करू शकत नाही. तसेच, संपूर्ण आठवड्यात १००० पेक्षा जास्त कॉल करू शकणार नाही. एखाद्या ग्राहकाने जर जास्त कॉल केले तर, त्याला त्यावर चार्ज भरावा लागेल. दरम्यान, या प्लॅनमध्ये ग्राहकाला प्रतिदिन १जीबी डेटा मिळणार आहे. सोबतच या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएसही मिळणार आहेत. ५०९ रूपयांना हा प्लॅन उपलब्ध आहे.
व्होडाफोनने त्याचबरोबर ४५० रूपयांचा दुसरा प्लॅनदेखील आणला आहे. ग्राहकाला या प्लॅनमध्ये ७० दिवसांची वैधता, प्रतिदिन १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. सर्वसाधारणपणे ५०९ रूपयांच्या प्लॅनसारखाच हा प्लॅनही आहे. फक्त या प्लॅनची वैधता ७० दिवसांसाठी असणार आहे.
