नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा दिवस जो आपण बालदिन म्हणून देशभर साजरा करतो. आजच्या दिवशी त्यामुळे देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पण याचदिवशी एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. या शुभेच्छा सोशल मीडियावरही चांगल्याच ट्रोल झाल्या.
कंडोम कंपनीच्या अंगलट आल्या बालदिनाच्या शुभेच्छा
बालदिन हा सुरूवातीच्या काळात २० नोव्हेंबरला साजरा केला जात असे. पण पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर मात्र हा दिवस १४ नोव्हेंबरला साजरा केला जाऊ लागला. दरम्यान, बालदिनानिमित्त ड्यूरेक्स या कंडोम कंपनीनेही शुभेच्छा दिल्या. या कंपनीने शुभेच्छा देताना एक हटके फोटो वापरला आणि त्यासोबत हॅप्पी चिल्ड्रन डे असा संदेशही दिला. ड्युरेक्सने शुभेच्छा देताना वापरलेला फोटो असा होता की, कंडोमच्या एका पाकीटाला लॉलिपॉपसारखे बनवून पोस्ट करण्यात आले होते. महत्त्वाचे असे की, लॉलिपॉप मुलांना फारच आवडते. त्यामुळे बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिलेल्या शुभेच्छा पाहताच नेटीझन्सनी हा फोटो चांगलाच ट्रोल केला.
Happy #ChildrensDay pic.twitter.com/rUTQGpAKTy
— Durex India (@DurexIndia) November 14, 2017
काही लोकांनी हा फोटो पाहून मोठ्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या. काहींचे म्हणणे असे की, अशा प्रकारे कंडोम कंपनीने शुभेच्छा देणे योग्य नाही. कारण कंडोम वापरला तर, मुलेच जन्माला येणार नाही.