महिलांची अंर्तवस्त्र वापरत आहेत जपानमधील पुरूष


जपान: शीर्षकावरूनच ही बातमी जर वाचण्यात ऐवढी विचीत्र वाटत असेल तर बघण्यात किती त्रास होत असेल विचार करा. होय पण हे खरे आहे. जपानमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र पुरुष वापरतात. याबाबत एका जपानी इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, येथील महिलांच्या ब्रा आणि पॅंटी वापरण्याची क्रेझ पुरूषांमध्ये वाढत आहे. हा एक हार्मोन्सचा बदलही सांगितला जात आहे, पण आता येथील मुले नेल पॉलिशचा वापर करायला लागले आहेत. आता पुरूषांचे कपडे स्लिम व्हायला लागले आहेत.

एका कंपनीने पुरूषांच्या या कृतीवर विशेषकरून पुरुषांसाठी वेगळ्या प्रकारच्या नव्या डिझाईनच्या ब्रा आणि पॅंटी तयार करणे सुरू केले आहे. याबाबत डेली मेलमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, पुरूषांसाठी ब्रा, निकर, सिल्की नायटी आणि याप्रकारचे आयटम लॉन्जरी बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या जपानच्या ऑनलाईन रिटेलर शॉपने तयार केले आहे, जे सर्वसाधारणपणे महिला परिधान करतात.
माध्यमांना कंपनीच्या मालकाने सांगितले की, आता कंपनी पुरूषांची आवड ध्यानात घेऊन पहिल्यांदाच पुरूषांसाठी याप्रकारचे क्पडे बनवत आहे. पूरूषांच्या आवडीकडे अधिक लक्ष देऊन हे खासकरून तयार केले जात आहेत.

पुरुषांना स्तन नसतात त्यामुळे त्यांची ब्रा वेगळी असेल आणि त्याची साईझही पूरूषांनुसार असेल. कित्येक पुरूष त्यांच्या आतील महिलेला शांत करण्यासाठी आजकाल महिलांचे अंतर्वस्त्र वापरायला लागल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

जपानमध्ये आता हे कपडे ऑनलाईनही मिळत असून याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ही बातमी वाचून आता तुम्हालाही धक्का बसला असेल पण जपानमध्ये असे सध्या घडत असून जपानमधील पुरुषांमध्ये बघितला जाणारा हा बदल येणा-या काळात संशोधनाचा विषय ठरू शकतो.

Leave a Comment