भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात लहान फोन


नवी दिल्ली : सॅमसंग, विवो आणि अ‍ॅपल सारख्या दिग्गज कंपन्याच्या गर्तेत भारतीय बाजारात जगातील सर्वात लहान मोबाईल एका मोबाईल निर्माती कंपनीने लॉन्च केला आहे.

हा स्मार्टफोन इलारी कंपनीने लॉन्च केला असून नॅनोफोन सी चे अपग्रेड व्हर्जन या फोनला मानले जात आहे. कंपनीने जुलैमध्ये नॅनोफोन सीच्या जुन्या व्हर्जनला लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत त्यावेळी ३९४० रूपये ठेवण्यात आली होती. या नव्या फोनची किंमत आता कमी ठेवण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर ऑनलाईन Yerha.com वरून विकत घेतला जाऊ शकतो. २ हजार ९९९ रूपये किंमत असलेल्या या फोनला प्लेटिनम सिल्व्हर, रोज गोल्ड आणि ब्लॅक रंगात लॉन्च करण्यात आला आहे. जगातील सर्वात लहान स्मार्टफोनचे फंक्शन आणि डिझाईन ब-याचअंशी जुन्या फोनसारखेच आहेत. हा फोन ब्लूटूथला सपोर्ट करतो.

हा जगातील सर्वात लहान फोन असण्यासोबतच सर्वात कमी वजनाचाही आहे. केवळ ३० ग्रॅम एवढे या फोनचे वजन आहे. कंपनीने या नव्या मॉडेलमध्ये जास्त फिचर्स वाढवले नाही. कंपनीकडून सांगितले गेले आहे की, या फोनसाठी हे फिचर्स पुरेसे असून नॅनो सी फोनमध्ये ब्लूटूथ, कॉल रेकॉर्डर, कॅलक्युलेटर, ३२ जीबी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. मायक्रो सिम या फोनमध्ये टाकता येते. यासोबतच मनोरंजनासाठी यात एमपी३ प्लेअर, एफएम रेडिओ, अलार्म आणि व्हॉईस रेकॉर्डर दिले गेले आहे.

१.० इंचाचा TFT डिस्प्ले नॅनो फोन सीमध्ये देण्यात आला आहे. मीडिया टेक MT6261D प्रोसेसर यात दिला गेला असून ३२ एमबीची रॅम देण्यात आली आहे. तसेच ३२ एमबी इंटरनल मेमरी दिली आहे. जी मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच या फोनला २८०mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment