एसबीआयने सहा महिन्यात १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बसवले घरी


नवी दिल्ली – सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केली जात असून एसबीआयने गेल्या ६ महिन्यांमध्ये १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. एसबीआयने यासोबतच या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियाही जवळपास थांबवली आहे.

एसबीआयमध्ये आठ महिन्यांपूर्वीच पाच बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय एसबीआयमध्ये महिला बँकदेखील विलीन करण्यात आली. कर्मचाऱ्यांची संख्या पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाढली. स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँकेचे यंदाच्या वर्षातील १ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यामुळे एसबीआयच्या अंतर्गत या सर्व बँका आल्या.

एसबीआयच्या देशभरातील शाखांची एकूण संख्या विलीनीकरणामुळे ६ हजार ४८७ ने वाढल्यामुळे २३ हजार ४२३ वर जाऊन एसबीआयच्या शाखांची संख्या पोहोचली. एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची मार्च २०१७ मध्ये संख्या २ लाख ७९ हजार ८०३ ऐवढी होती. हा आकडा सप्टेंबरअखेरीस २ लाख ६९ हजार २१९ वर आला आहे. स्टेट बँकेने या कालावधीत केवळ ७९८ कर्मचाऱ्यांची भरती केली.

Leave a Comment